रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

एक होता पाऊस

पाऊस कुणाला आवडत नाही. तरुणाईला तर तो  आवडतोच आवडतो................पण छोट्यांनाही आवडतो..............संध्याकाळच्या सावल्या खुणावत असताना मोठ्यांना हि तो हवासा वाटतो. कारण पाऊस
असतोच तसा हवा हवासा. पण या कवितेतला छोट्या मात्र त्या पावसाशी चक्क लपाछपी खेळतोय. मागे मी ' एक होतं वांग '

कृष्ण सावळा होईन मी


आपली प्रेयसी, आपली सखी खूप सुंदर असावी असं जसं प्रत्येकाला वाटतं. तशीच ती खूप प्रेमळ आणि सुस्वभावी असावी असंही वाटतं. ती तुळशीवृंदावनातल्या तुळशी एवढी पवित्र आणि सोज्वळ असावी असाही आपला हेका असतो.

पण तिच्याकडून एवढ्या अपेक्षा करताना आपण कसे आहोत किंवा तिच्याही तिच्या मनातल्या सख्याविषयी, तिच्या जिवलगाविषयी काही अपेक्षा असतील असा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. ती दिसते........ सुंदर असते.......... म्हणून आपण तिच्या प्रेमात पडतो........…खोल खोल बुडत जातो. तिला आपल्याविषयी काय वाटतं

रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

On Beach with My Mother

Actually I never visit Melbourne in my life. But i Hope let the your time come fist and then My.  So  ‘…it's your time to visit Melbourne NOW!’
My mother is another image of sea. But she never visit a sea in her life.
Once

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

अशीही एक आई

mother, hensजगातला सगळ्यात प्राईम सब्जेक्ट कोणता असेल तर आई. आधी प्राईम सब्जेक्टला प्राधान्य विषय हा प्रती शब्द आठवत नव्हता. म्हणून आधी प्राईम सब्जेक्ट असा शब्दप्रयोग केला होता.

कोणत्याही जीवाचा जन्म आईमुळे वडिलांमुळे ? किंवा कोणत्याही जीवाच्या जन्मात महत्वाची भूमिका कुणाची ? नराची कि मादीची ? 

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

ब्लॉगर्सचा मेळावा .... माझं रक्तदान

खरंतर खूप दिवस झाले या गोष्टीला. दिवस कसले महिने झालेत. आणि आज लिहितोय मी त्या घटनेबद्दल. शिळ्या वर्तमान पत्रासारखं वाटेल आज हे सारं वाचताना. वेळ नव्हता लिहायला असं नाही. पण नेट आणि संगणक या सुविधा नव्हत्या माझ्याजवळ. आणि आणखीही काही वर्ष नसतील त्या. शेतावरून पुण्यात आल्यावरच लिहिणं शक्य होतं मला.मग तुम्ही म्हणाल ७ जुलैला घडलेल्या त्या घटनेनंतर तुम्ही आलाच नाहीत का पुण्यात ? आलो होतो. पण अत्यंत घाईत. आलो त्या पावली परत गेलो होतो.
घटना गंभीर नव्हती.

मोर आणि लांडोर

सौंदर्याच वेड कुणाला नाही.
प्रियकराला त्याची प्रेयसी सुंदर असावी असं वाटतं.........नवऱ्याला त्याची बायको देखणी असावी असं वाटतं..........अगदी मुलांना सुद्धा त्यांची आई दिसायला छानच हवी असते.छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धुरंधर.......हरहुन्नरी..........लढवय्या..........द्रष्टा.........राजासुद्धा एके क्षणी -

" अशीच अमुची माता असती सुंदर रूपमती
आम्हीही झालो असतो सुंदर ......................"
असं म्हणतो.

पण हे असं सौंदर्याच वेड आमच्यासारख्या मानव प्राण्याला अधिक. पशूंच्या आणि पक्ष्यांच्या राज्यात नर हा मादीपेक्षा अधिक देखणा असतो. मोर आणि लांडोर हे त्याचं एक सहज सुंदर उदाहरण.
लांडोरीपेक्षा मोर कितीतरी देखणा. मोरपंखी पिसारा असलेला........डोक्यावर झकास तुरा लाभलेला......पिसारा फुलवून थुई थुई नाचता येणारा........अंगभर वेगवेगळ्या रंगांचा सडा असलेला. रगांची एवढी उधळण परमेश्वरानं अन्य कुठल्या प्राण्यावर केल्याचा मला माहित नाही.

असं असलं तरी मोराला लांडोरीची सोबत मिळवण्यासाठी किती यातायात करावी लागते माहिती आहे तुम्हाला.

मंगळवार, ३१ जुलै, २०१२

खरंच का गगन ठेंगणे ?

काल काही वर्तमान पत्रात हेड लाईन वाचली - " भारताला गगन ठेंगणे ".

तेव्हा मला पडलेला हा प्रश्न -  खरंच का गगन ठेंगणे ?

गगन नारंग. २०१२ च्या ऑलंपिक मध्ये भारताचं नाव पदक तक्त्यात आणणारा पहिला खेळाडू. एक जिगरबाज नेमबाज. अपेक्षेनुसार कामगिरी साधणारा एक हरहुन्नरी. त्यानं पदक मिळवलं आणि लगेच हरियाना सरकारनं त्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सरकारी तिजोरीतून कुणा एका व्यक्तीला पैश्याच्या स्वरुपात अशा रीतीने बक्षीस देणं योग्य आहे ?

प्रश्न

( या पोस्टमधल्या मुलाला पडलेला प्रश्न स्वभाविक नाही काय? )
आपल्याकडे शिक्षण समित्या असतात. त्या समित्यांवर अनेक शिक्षण तज्ञ असतात. तरीही अभ्यासक्रमात कोणतीही सुसूत्रता नसते. बर्याच वर्षापूर्वी " मुलांच्या पाठीवर एवढे ओझे येते कुठून " हा माझा लेख दैनिक सकाळमधून प्रकाशित झाला होता. अर्थात माझ्या लेखामुळे परिस्थितीत कोणताच बदल झाला नाही.

अनेक मंत्री आले. त्यांनी अनेक प्रयोग केले. वर्तमान पत्रातून झळकणारी गुणवत्ता यादी गायब झाली. अगदी आठवी पर्यंत परीक्षाच नकोत. इथपर्यंत निर्णय झाला. कारण काय तर म्हणे

मी कुणाचा दास नाही

( हि मराठी कविता एका खूप उद्विग्न मनस्थितीत लिहिली आहे. ज्वालामुखीतून उफाळणारा लाव्हा बाहेर पडावा, तशी एका वास्तव प्रसंगी हि कविता आकाराला आली आहे. म्हणुनच ......

ते विषाचा घागरी
मी अमृताचा गडवा

किंवा

पेरतो मी सदगुणांना
भोवतीने भोवताली ............

या सारख्या ओळी वाचून. हा काय स्वतःला फार सदगुणी समजतो काय ? असा सूर कुणीही काढू नये. माझी मनस्थिती समजावून घ्यावी.  दुर्गुण माझ्यातही आहेत. पण


सोमवार, २ जुलै, २०१२

हे किडे कशासाठी ?

२२ वर्ष नौकरी केली. वडीलांच्या आकस्मित निधनानं पोरक्या झालेल्या शेतीला आधार देण्यासाठी नौकरी सोडायचा निर्णय घेतला. मोठ्या हौसेने प्रोडक्शन म्यानेजर या मोठ्या पदावरची एका बहु देशीय  कंपनीतली नौकरी सोडून शेती करायला गेलो. वडील गेल्यानंतर ऑक्टोबर २०१० ला चार एकर उस लावला होता. डिसेंबर २०११ ला नौकरी सोडून कायमचा शेतावर गेलो. नव्यानं दीड उस एकर लावला. दीड एकर भुईमुग पेरला. एकरभर भेंडी लावली. आणि