रविवार, १ जुलै, २०१२

ऑक्सिजनचा हिशोब

आयुष्यात आपण खूप हिशोब करतो. या महिन्यात पेट्रोलला किती पैसे गेले.......सिनेमे पाहण्यावर किती पैसे खर्च झाले.......बस खर्च किती झाला.......किराणा कितीचा झाला.........वगैरे वगैरे. कारण या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागता. घरातल्या ग्यास सिलेंडरचे भाव वाढले तर आपल्याला लगेच कळतं. पण आमच्या ग्रामीण भागातील जनतेला त्याच्याशी काहीएक घेणंदेणं नसतं. कारण
त्यांच्या चुली रानातून मिळणाऱ्या सरपणावर पेटत असतात. थोडक्यात काय तर ज्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात त्याचे हिशोब आपण करत असतो. पण विनामूल्य ( फुकटात ) मिळणाऱ्या गोष्टींचे आपण कधीच हिशोब करीत नाही.
मागे लिहिलेल्या माझ्या ' मला झाड व्हायचं ' या आणि इतर काही पोस्टमध्ये. झाडांच्या गरजेविषयी लिहिलं आहे.
ऑक्सिजन
हि अशीच एक गोष्ट. आपल्याला आयुष्यात किती रुपये किमतीचा ऑक्सिजन लागतो याचा हिशोब आपण कधीच मांडत नाही. कारण तो आपल्याला फुकटात मिळतो ना. पण थोडा हिशोब करून पहा.
एका माणसाला एका दिवसाला ३ सिलेंडर  ऑक्सिजन लागतो.
एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत साधारणतः ७०० रुपये पडते.
म्हणजे एका दिवसाला एका माणसाला ७०० X ३ = २१०० रुपयाचा ऑक्सिजन लागतो.
माणसाचे सरासरी वय ६५ वर्ष गृहीत धरू या.
वर्षाचे दिवस ३६५.
आता करू एकूण हिशोब -
     ३     एका दिवसाला लागणारे ऑक्सिजनचे सिलेंडर
X  ७०० एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत
X  ३६५ एका वर्षाचे दिवस
X  ६५   एका माणसाचे सरासरी वय.
-------------------------------------------
४९८२२५०० रुपये. एका ६५ वर्षे वयाच्या माणसाला त्याच्या आयुष्यात लागणाऱ्या ऑक्सिजनची किंमत. 
( अक्षरी रुपये चार कोटी अठ्यांनो लाख बावीस हजार पाचशे फक्त. )
फक्त हा शब्द रिवाज म्हणून लावला आहे. एवढ आपल्याला फुकटात मिळतं आणि तरीही आपण म्हणतो देवानं मला काय दिलं.
देवानं खूप काही दिलंय. पण आपल्याला ते सांभाळता येत नाही. आपण फक्त निसर्गाचा ऱ्हास करत चालोय. 
आयुष्यात कमीत कमी एक तरी झाड लावा आणि सांभाळा स्वतःला. निसर्गाला नव्हे.



cost of oxygen

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा