mrathi poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mrathi poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

कृष्ण सावळा होईन मी


आपली प्रेयसी, आपली सखी खूप सुंदर असावी असं जसं प्रत्येकाला वाटतं. तशीच ती खूप प्रेमळ आणि सुस्वभावी असावी असंही वाटतं. ती तुळशीवृंदावनातल्या तुळशी एवढी पवित्र आणि सोज्वळ असावी असाही आपला हेका असतो.

पण तिच्याकडून एवढ्या अपेक्षा करताना आपण कसे आहोत किंवा तिच्याही तिच्या मनातल्या सख्याविषयी, तिच्या जिवलगाविषयी काही अपेक्षा असतील असा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. ती दिसते........ सुंदर असते.......... म्हणून आपण तिच्या प्रेमात पडतो........…खोल खोल बुडत जातो. तिला आपल्याविषयी काय वाटतं

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

मोर आणि लांडोर

सौंदर्याच वेड कुणाला नाही.
प्रियकराला त्याची प्रेयसी सुंदर असावी असं वाटतं.........नवऱ्याला त्याची बायको देखणी असावी असं वाटतं..........अगदी मुलांना सुद्धा त्यांची आई दिसायला छानच हवी असते.छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धुरंधर.......हरहुन्नरी..........लढवय्या..........द्रष्टा.........राजासुद्धा एके क्षणी -

" अशीच अमुची माता असती सुंदर रूपमती
आम्हीही झालो असतो सुंदर ......................"
असं म्हणतो.

पण हे असं सौंदर्याच वेड आमच्यासारख्या मानव प्राण्याला अधिक. पशूंच्या आणि पक्ष्यांच्या राज्यात नर हा मादीपेक्षा अधिक देखणा असतो. मोर आणि लांडोर हे त्याचं एक सहज सुंदर उदाहरण.
लांडोरीपेक्षा मोर कितीतरी देखणा. मोरपंखी पिसारा असलेला........डोक्यावर झकास तुरा लाभलेला......पिसारा फुलवून थुई थुई नाचता येणारा........अंगभर वेगवेगळ्या रंगांचा सडा असलेला. रगांची एवढी उधळण परमेश्वरानं अन्य कुठल्या प्राण्यावर केल्याचा मला माहित नाही.

असं असलं तरी मोराला लांडोरीची सोबत मिळवण्यासाठी किती यातायात करावी लागते माहिती आहे तुम्हाला.

मंगळवार, ३१ जुलै, २०१२

मी कुणाचा दास नाही

( हि मराठी कविता एका खूप उद्विग्न मनस्थितीत लिहिली आहे. ज्वालामुखीतून उफाळणारा लाव्हा बाहेर पडावा, तशी एका वास्तव प्रसंगी हि कविता आकाराला आली आहे. म्हणुनच ......

ते विषाचा घागरी
मी अमृताचा गडवा

किंवा

पेरतो मी सदगुणांना
भोवतीने भोवताली ............

या सारख्या ओळी वाचून. हा काय स्वतःला फार सदगुणी समजतो काय ? असा सूर कुणीही काढू नये. माझी मनस्थिती समजावून घ्यावी.  दुर्गुण माझ्यातही आहेत. पण


शनिवार, ३० जून, २०१२

होई आता थेंब


गावाहून रविवारीच आलो होतो. पण दुष्काळसदृश परिस्थिती ओढवल्यामुळे लिहिण्याचा मूड नव्हता. दिवसातून चार चार वेळा उदास चेहऱ्यानं आभाळाकडं पहायचो. आणखी निराश व्हायचो. आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल या आशेवरच दिवस ढकलतो आहे.

कुणीतरी म्हणलं," होतं एकादशीला नक्की पाऊस पडणार आहे." हाही एक आशावादच. पण आज सकाळपासून मोकळं आभाळ आणि लख्खं उन पाहून अधिक निराश झालो. हवामान खात्याच्या अंदाजांवरचा माझा विश्वास उडाला असला तरी

शुक्रवार, २९ जून, २०१२

पाटी तेवढी खरी वाटते.

मुलांना सुट्टी खूप हवीशी वाटते. पण ‘ अती केलं, माती झालं ‘ या न्यायानं मुलांनाही या सुट्टीचा कंटाळा येतो. शाळा हवीशी वाटू लागते. नवा गणवेष……….नवा ड्रेस……….. नवा बूट………नवे मोजे…………नवं दफ्तर………. नवी पुस्तकं………..नव्या वह्या………..साहजिकच सुट्टीचा कंटाळा येऊन शाळेची ओढ वाटू लागते. या कवितेतल्या मुलाला तरी सुट्टीचा खरंच कंटाळा आला म्हणून तो म्हणतोय -