विठ्ठल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विठ्ठल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३० जून, २०१२

होई आता थेंब


गावाहून रविवारीच आलो होतो. पण दुष्काळसदृश परिस्थिती ओढवल्यामुळे लिहिण्याचा मूड नव्हता. दिवसातून चार चार वेळा उदास चेहऱ्यानं आभाळाकडं पहायचो. आणखी निराश व्हायचो. आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल या आशेवरच दिवस ढकलतो आहे.

कुणीतरी म्हणलं," होतं एकादशीला नक्की पाऊस पडणार आहे." हाही एक आशावादच. पण आज सकाळपासून मोकळं आभाळ आणि लख्खं उन पाहून अधिक निराश झालो. हवामान खात्याच्या अंदाजांवरचा माझा विश्वास उडाला असला तरी