पाऊस कुणाला आवडत नाही. तरुणाईला तर तो आवडतोच आवडतो................पण
छोट्यांनाही आवडतो..............संध्याकाळच्या सावल्या खुणावत असताना
मोठ्यांना हि तो हवासा वाटतो. कारण पाऊस
असतोच तसा हवा हवासा. पण या कवितेतला छोट्या मात्र त्या पावसाशी चक्क लपाछपी खेळतोय. मागे मी ' एक होतं वांग '
हि कविता लिहिली होती. या कवितेतला पाऊसही तसाच
मुलांशी समरसून जाणारा. लपाछपी खेळताना डोंगराआड लपणारा. वीज होऊन मुलांकडे डोळे मिचकावत पहाणारा.
पण मुलं ! ती पावसापेक्षाही द्वाड. ती थोडीच त्याला ताकासतूर लागू देणार ? ती बरोबर डोंगराआड लपलेल्या पावसाचा मग काढत त्याच्या पाठीशी जातात. आणि त्याच्या पाठीत एक जोरदार धप्प देतात. मोठ्यांना हुलकावण्या देणाऱ्या पावसाला मग सर होवून बरासावच लागतं. आपला सवंगडी आपल्याला भेटला म्हणून मग मुलंही त्याच्या हातात हात घालून पाऊस होतात. तेव्हा आपण मुलांना ओरडू नये........दोन सवंगड्यांची झिम्माड पहात रहावं.
हि कविता लिहिली होती. या कवितेतला पाऊसही तसाच
पण मुलं ! ती पावसापेक्षाही द्वाड. ती थोडीच त्याला ताकासतूर लागू देणार ? ती बरोबर डोंगराआड लपलेल्या पावसाचा मग काढत त्याच्या पाठीशी जातात. आणि त्याच्या पाठीत एक जोरदार धप्प देतात. मोठ्यांना हुलकावण्या देणाऱ्या पावसाला मग सर होवून बरासावच लागतं. आपला सवंगडी आपल्याला भेटला म्हणून मग मुलंही त्याच्या हातात हात घालून पाऊस होतात. तेव्हा आपण मुलांना ओरडू नये........दोन सवंगड्यांची झिम्माड पहात रहावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा