bloggers meet. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
bloggers meet. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

ब्लॉगर्सचा मेळावा .... माझं रक्तदान

खरंतर खूप दिवस झाले या गोष्टीला. दिवस कसले महिने झालेत. आणि आज लिहितोय मी त्या घटनेबद्दल. शिळ्या वर्तमान पत्रासारखं वाटेल आज हे सारं वाचताना. वेळ नव्हता लिहायला असं नाही. पण नेट आणि संगणक या सुविधा नव्हत्या माझ्याजवळ. आणि आणखीही काही वर्ष नसतील त्या. शेतावरून पुण्यात आल्यावरच लिहिणं शक्य होतं मला.मग तुम्ही म्हणाल ७ जुलैला घडलेल्या त्या घटनेनंतर तुम्ही आलाच नाहीत का पुण्यात ? आलो होतो. पण अत्यंत घाईत. आलो त्या पावली परत गेलो होतो.
घटना गंभीर नव्हती.